कोपरगाव – ट्रकने १ जणांला चिरडले, ट्रकचालक फरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
accident

कोपरगाव भरधाव ट्रकने रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांला चिरडले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली. ट्रक चालक ट्रक सोडून पळून गेला.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास कोळपेवाडी साखर कारखान्याचे गट ऑफिस समोर रोडवर कोळपेवाडी येथे अति वेगाने जाणाऱ्या ट्रकने रस्त्याने पायी जात असलेल्या संजय रघुनाथ चव्हाण यांना पाठीमागून जोराची धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर ट्रक चालक हा घटनास्थळावरून पळून गेला आहे. पोलीस या ट्र्क चालकाचा शोध घेत आहेत.