कोपरगावात बाप-लेकाची गळफास घेऊन आत्महत्या

1226

कोपरगावातील शिंगणापूर हद्दीतील संजीवनी कारखाना पेट्रोलपंपासमोर स्टेशन रोडवर राहणाऱ्या बाप-लेकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (३ जुलै) रोजी रात्री उघडकीस आली. राहुल संजय फडे (27) आणि संजय रंगनाथ फडे (50) अशी मृतांची नावे आहे. मुलगा राहुल हा एका शिक्षण संस्थेत लॅब सहाय्यक असून दोन वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते त्यांना दीड वर्षाचा एक मुलगा असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच वडील संजय फडे हे नटराज नावाची घरगुती खानावळ चालवत होते.

मुलाने रात्री बारा वाजेच्या सुमारास घरातील पंख्याला दोरी बांधून गळाफास घेऊन आत्महत्या केली होती. हे पाहिल्यानंतर पहाटे पाच वाजेच्या सुमारास बापानेही गळाफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना घडली. एकाच कुटुंबातील दोघांनी आत्महत्या केल्याने अनेक शंका-कुशंका उपस्थित करण्यात येत आहेत. घरातील कौटुंबिक कलह, ताण तणाव व कुरबुरी मुळे बापलेकाने आत्महत्या केल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आह. मात्र खरं कारण पोलीस तपासात पुढे येईल.

दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोपरगाव शहर पोलीस घटनास्थळी हजर झाले आणि मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले, याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बाप लेकावर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्याच्या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या