
कोयना धरणाचा परिसर सोमवारी रात्री भूकंपाच्या सौम्य धक्क्याने थरारला. रिश्टर मापकावर या धक्क्याची तीव्रता 3.2 इतकी नोंदली गेली. रात्री 11.37 वाजता झालेला हा भूकंप विशेषतः कोयनानगर परिसरात जाणवला.
या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनेपासून 24 किलोमीटर अंतरावर वारणा खोऱ्यात चांदोली गावाच्या पूर्वेस 7 किलोमीटर अंतरावर होता. केंद्रबिंदूची खोली 17 किलोमीटर इतकी होती.





























































