
आपल्यालाच आपल्या मराठी भाषेची लाज वाटते; या पृथ्वीरची पहिलीच जमात असेल आपली ज्याला आपल्या आईची लाज वाटते… सचिन खेडेकर यांचा हा डायलॉग अंगावर काटा आणतो… हा डायलॉग आहे ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटातला. या चित्रपटाचा नुकताच अलिबाग येथे ट्रेलर रिलीज करण्यात आला.
View this post on Instagram
राज्यात कमी होत जाणाऱ्या मराठी माध्यमांच्या शाळांवर आधारित ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. मराठी शाळांची सध्याची परिस्थिती यावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे.
हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटात दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर मुख्याध्यापकाच्या भूमिकेत आहेत. तर त्यांच्यासोबत अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 1 जानेवारी 2026 ला प्रदर्शित होणार आहे.



























































