सातारा जिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. मृतदेह ताब्यात देताना त्यांची अदलाबदल झाल्यामुळे नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात धरणे आंदोलन केले. याप्रकरणी रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

वाई तालुक्यातील सोनगिरवाडी येथील आनंद ओव्हाळ या तरुणाचे जिल्हा रुग्णालयात सोमवारी रात्री निधन झाले. सातारा तालुक्यातील आरळे येथील सुरेश खोमणे यांचेही सोमवारी रात्री निधन झाले. अंत्यसंस्कारापूर्वी मृत ओव्हाळ यांच्या आजीने नातवाचा चेहरा पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी जिल्हा रुग्णालयाचा सावळागोंधळ चव्हाटय़ावर आला.