मथुरेत श्रीकृष्णाचे भव्य मंदिर उभारण्याची तयारी सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मथुरेत भगवान श्रीकृष्णाचे भव्य मंदिर लवकरच उभारले जाणार असल्याची माहिती श्रीकृष्ण जन्मभूमी निर्माण न्यासाचे अध्यक्ष देवमुरारी बापू यांनी दिली आहे. या मंदिर निर्माण अभियानाला चालना देण्यासाठी जानेवारी महिन्यात संमेलन आयोजित करण्यात आले आहे. बुधवारी येथील निराला नगर मधील गेस्ट हाऊसमध्ये या विषयावर चर्चा करण्यासाठी बैठक झाली.

श्रीकृष्ण जन्मभूमी न्यासाच्या या कार्यात आतापर्यंत 23 जिल्ह्यांतील 500 पेक्षा जास्त धर्मगुरु जोडले गेले आहेत. काही सामाजिक संस्थाही या मंदिर निर्मितीच्या कार्याला हातभार लावत आहेत. याकरिता येत्या जानेवारी महिन्यात उत्तर प्रदेशात धर्मगुरुंच्या उपस्थितीत एक संमेलन भरवण्यात आले आहे. यावेळी उत्तर प्रदेशातील मनकामेश्वर मंदिराचे महंत देव्यागिरी यांनी सांगितले की, मथुरेच्या भूमीत श्रीकृष्णाचे भव्य मंदिर निश्चितच बांधले जाईल, मात्र लोकांना यासाठी संयम बाळगायला हवा.