कुडाळात 1 हजार 250 बंधारे बांधले जाणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकणात धो-धो पाऊस कोसळत असतो पण आजही पाण्याचे योग्यतNहेने नियोजन केले जात नसल्याने अनेक गावांमध्ये उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ ग्रामस्थांवर येते. उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ नये, मुबलक पाणीसाठा उपलब्ध व्हावा यासाठी कुडाळ तालुक्यात लोकसहभाग व श्रमदानातून यावर्षी 1 हजार 250 बंधारे बांधण्याचे नियोजन पंचायत समितीमार्पâत करण्यात आले आहे. याकरिता शुक्रवारी ११ डिसेंबर रोजी बंधारा दिवस साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी एकाचवेळी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत क्षेत्रात जास्तीतजास्त बंधारे बांधण्यात येणार आहेत. पावशी व नेरूर येथे या मोहिमेचा शुभारंभ केला जाणार आहे.

पावसाळा संपताच भूजल पातळी वाढविण्यासाठी बंधारे बांधले जातात. कुडाळ पंचायत समितीच्यामार्पâत दरवर्षी तालुक्यात लोकसहभागातून वनराई व कच्चे बंधारे बांधले जातात. याला लोकचळवळीचे स्वरूप देऊन एक दिवस बंधाऱ्यासाठी अशी विशेष मोहिम राबविली जाते. 2 या वर्षांत 369, 2018-19 मध्ये 719 तर 2019-20 मध्ये एकाच दिवशी 753 बंधारे लोकसहभागातून बांधण्यात आले आहेत. हिच परंपरा यंदाही सुरू ठेवून एकाच दिवशी तालुक्यातील सर्व पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी, सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रा. पं. सदस्य, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, कर्मचारी, शेतकरी यांच्या सहभागातून मोठ्या प्रमाणावर बंधारे बांधून बंधारा दिन साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये अंगणवाडी कर्मचारी, युवक क्रिडा मंडळे, बचतगट, स्वयंसेवी संस्था विविध कर्मचारी संघटना यांचाही सहभाग घेण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करुन ही मोहिम राबविण्यात येणार आहे. तालुक्यात विविध भागात कच्चे बंधारे, वनराई बंधारे हे नदी नाल्यावर बांधले जातातच परंतु पाणथळ भातशेतीच्या खाचरातील पाणी अडवून त्याठिकाणी दगड, प्लॅस्टिक कापडाचा वापर करून अभिनव असा विजय बंधारा बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे.