आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुडाळ तालुक्यातील जाभंवडे गावामधील असंख्य भाजप कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शुक्रवारी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे.
जाभंवडे गावचा विकास हा आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून झाला असून आमदार नाईक यांनी विविध योजनांमधून लाखो रुपयांचा विकास निधी देऊन या भागातील ग्रामस्थांची विकासकामे मार्गी लावली आहेत, असे सांगत यापुढील काळातही ते जांभवडे गावातील विकासकामांना प्राधान्य देतील, असा विश्वास प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी जांभवडे युवासेना शाखाप्रमुख पदी नागेश मडव, युवासेना उपशाखाप्रमुख पदी अंकीत मडव, युवासेना शाखाप्रमुख पदी अविनाश गोवेकर, युवासेना समन्वयक पदी ओमकार मडव, ओबीसी सेल उपविभागप्रमुख पदी महेश खोचरे, महिला शाखाप्रमुख पदी सारिका खोचरे यांची जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या शिफारसीनुसार आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देत अभिनंदन करून नेमणूक करण्यात आली. यावेळी बोलताना आमदार नाईक म्हणाले की सत्ता कोणाची असो विकासाची जबाबदारी मी आमदार म्हणून माझी आहे. त्यामुळे या पुढील काळातही विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असा शब्द आमदार नाईक यांनी प्रवेशकर्त्यांना दिला आहे.
यावेळी नागेश मडव, अंकित मडव, लक्ष्मण खोचरे,महेश खोचरे,अविनाश गोवेकर, नयन मडव, ओंमकार मडव,यश मडव,सुधीर मडव, दयानंद मडव,तुकाराम खोचरे,जितेंद्र गोवेकर, मंदार गोवेकर, मिलिंद गोवेकर, प्रकाश गोवेकर,सुलोचना खोचरे,लीलावती खोचरे, दिपाली गोवेकर, प्रियंका गोवेकर, अनिता गोवेकर, सारिका खोचरे, अशोक पारकर,अर्चना पारकर, संदीप पेडणेकर, पार्वती गोवेकर, वैशाली गोवेकर, निर्मला गोवेकर, शंकर पेडणेकर, दिनेश साताडेकर,रंजना खोचरे या भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केल्याची माहीती आमदार नाईक यांच्या संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली. याप्रसंगी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणकवली विधानसभाप्रमुख सतिश सावंत, कुडाळ उपतालुकाप्रमुख सचिन कदम, महेश सावंत, आबा मुंज, घोटगे शाखाप्रमुख चंदन ढवळ, जांभवडे शाखाप्रमुख तेजस भोगले, हर्षद ढवळ, सिध्देश सावंत आदी शिवसैनिक उपस्थित होते.