
सामना प्रतिनिधी । कुडाळ
कुडाळ शहरातील मुख्य रस्त्यावर ऐन गणेशोत्सवात शनिवारी सकाळी काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. कुडाळ बसस्थानकाजवळ बस व कार यांच्यात अपघात झाला होता. या अपघातानंतर मुख्य रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. ही कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांचीही तारांबळ उडाली. कुडाळमधील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत असूनही यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नगरपंचायत व पोलीस प्रशासन अपयशी ठरत आहे.































































