
मराठा समाजासाठी राज्य सरकारने काढलेल्या 2 सप्टेंबरच्या जीआरला कुणबी समाजाचा तीव्र विरोध असून, मराठ्यांना कुणबी जातीचे दाखले देणे तातडीने बंद करावे, अन्यथा 9 ऑक्टोबर रोजी मुंबईत भव्य विराट मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा कुणबी समाजोन्नती संघटनेचे अध्यक्ष अनिल नवगणे यांनी आज दिला.
मराठा समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही, आमच्या मागासलेल्या समाजाच्या वाट्याला आलेल्या आरक्षणावर डल्ला मारला जात आहे. सरकारने कुणबीतून मराठ्यांना दाखले देणे तत्काळ थांबवावे, अन्यथा आम्हीही सरकारच्या मानेवर पाय ठेवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा नवगणे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
ओबीसींच्या 372 जाती आहेत. त्यांचे अनुशेष भरायचे सोडून, आमच्या हक्कावर गदा आणणारे निर्णय घेतले जात आहेत. मराठा समाजासाठी आधीच सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण फेटाळले असल्याची आठवण बावकर यांनी करून देत, कुणबी समाजाने सरकारचा जीआर मागे घेण्याचा ठाम पवित्रा घेतला असून ओबीसींच्या हक्कांसाठी आता निर्णायक लढा उभारणार असल्याचे चंद्रकात बावकर म्हणाले.