चार बांगलादेशी घुसखोरांना पकडले, कुरार पोलिसांची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चार बांगलादेशी घुसखोरांना पडकण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. मालाड पूर्वच्या कुरारगाव परिसरात पोलिसांनी चार बांगलादेशी नागरिकांना पकडले. ते चौघेही वसईमध्ये वास्तव्य करत होते. तसेच विविध प्रकारची कामे करून आपला उदरनिर्वाह करीत होते.

पठाणवाडी येथील विविध ठिकाणी बांगलादेशी नागरिक येणार असल्याची माहिती कुरार पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तीन दिवस पाळत ठेवून मिळालेल्या माहितीच्या आधारे तुहिनूर सरदार (30), अब्दुल बिस्वास  (52), नजरुल बिस्वास (41) आणि इमामुल रहेमान (46) अशा चौघांना पकडले. तुहिनूर चिकन शॉपमध्ये काम करत होता, तर अब्दुल हा बिगारीकाम, नजरुल भंगार खरेदी-विक्रीचे काम आणि इमामुल बिगारीकाम करत होता. या चौघांची त्यांच्या देशात रवानगी करण्याची प्रक्रिया पोलीस करीत आहेत.