
मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकात प्रवाशांना मोबाईल अॅपवर चालणाऱ्या ई-बाईक सेवेचा शुभारंभ गुरुवारपासून करण्यात आला आहे. या अॅपवर बुक होणाऱ्या ई-बाईक बॅटरीवर चालणाऱ्या असून प्रदूषण टाळणाऱ्या तसेच वाहतूककाsंडीतून सुटका देणाऱ्या या ई-बाईक हळूहळू प्रसिद्ध झाल्या आहेत. कुर्ला ते बीकेसी परिसरात जाण्यासाठी अर्ध्या तासाकरिता 25 रुपये भाडे आकारण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेच्या मेन आणि हार्बर मार्ग एकत्र येणाऱ्या कुर्ला या गर्दीच्या स्थानकात वांद्रे-कुर्ला का@म्प्लेक्सचा विकास झाल्यानंतर प्रचंड गर्दी वाढली आहे. यासाठी मध्य रेल्वेने प्रवाशांना पर्यावरणस्नेही वाहतुकीचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी मे.युलु बाईक प्रा. लि. या कंपनीशी एक वर्षाचा करार केला आहे. कुर्ला स्थानक पश्चिमेकडील बाजूकडील 115 चौरस मीटर जागा बाईक पार्ंकग, चार्ंजग आणि व्यवसाय करण्यासाठी 2 लाख 15 हजार रुपयांच्या भाडय़ाने देण्यात आली आहे. ‘पब्लिक बाईक शेअरिंग’अंतर्गत मध्य रेल्वेशी हा करार आल्याने मध्य रेल्वेच्या कुर्ला येथे उतरणाऱ्या प्रवाशांना स्वस्तातील, सुरक्षित आणि ईको फ्रेंडली वाहतुकीचा पर्याय मिळाला असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्प अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.
मध्य रेल्वेवर आठ स्थानकांत सुविधा
सध्या ‘सोशल डिस्टन्सिंग’ राखून सॅनिटाईज केलेल्या बाईक प्रवाशांना भाडय़ाने देण्यात येत आहेत. याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात प्लॅटफॉर्म क्र. 18 कडील प्रवेशद्वाराजवळ ई-कारसाठी चार्ंजग पॉइंट उभारण्यात आला असून त्याची सध्या चाचणी सुरू आहे. कुर्ला स्थानकानंतर सीएसएमटी स्थानकात अॅपवर धावणारी बस सेवा, ठाणे स्थानकात ई-रिक्षाकरिता टेंडर काढण्यात आले असून भायखळा, एलटीटी, परळ, दादर, भांडुप स्थानकांतही ई-वाहने भाडय़ाने देण्याची सेवा सुरू करण्यात येणार आहे.
























































