तक्रार दिल्याच्या वादातून गोळीबार, एका महिलेचा मृत्यू

998
parner-murder

नगर मधील पारनेर तालुक्यात गोळीबार झाला असून या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. पारनेर तालुक्यातील वडझिरे गावत ही घटना घडली असून गोळीबारात सविता सुनील गायकवाड (वय 35)  या महिलेचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास ही घटना घडली.  या घटनेमुळे पारनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

गायकवाड यांचा मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे. वैद्यकीय तपासणीतून तीन गोळ्या छातीत घुसल्याने गायकवाड यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. राहुल गोरख साबळे असे गोळीबार करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. पोलीस पुढला तपास करत आहेत.

राहुल साबळे याच्या विरोधात गायकवाड आणि त्यांच्या मेहुण्यांनी तक्रार केली होती. तक्रार दिल्याचा राग मनात ठेवून आरोपीने फिर्यादी संतोष उबाळे आणि त्यांची मेहुणी साविता गायकवाड यांना शिवीगाळ करून गोळ्या झाडून तिला ठार मारले.

आपली प्रतिक्रिया द्या