
अमेरिकेतील एका व्यक्तीने दोन वर्षापूर्वी हरवलेली महागडी लँम्बोर्गिनी कार एआयच्या मदतीने शोधून काढली आहे. लँम्बोर्गिनी हुराकैन ही महागडी कार चोरीला गेली होती. कारचा फोटो चॅटजीपीटीमध्ये टाकत गुगलच्या लोकेशन टूल्स सोबत जोडले. कारच्या मालकाला चोरीला गेलेली कार कुठे आहे, हे समजले. त्याने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून ही माहिती दिली. गाडीची सविस्तर माहिती आणि कागदपत्रांवरून ही चोरीला गेलेली कार त्या व्यक्तीची असल्याचे स्पष्ट झाले.