छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळासाठी वढू बुद्रुक येथे अडीच एकर जमीन

स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शिरूरमधील वढू बुद्रुक येथील समाधीस्थळाच्या विकासासाठी पुण्यातील के.ई.एम. रुग्णालयाच्या मालकीची वढू बुद्रुक येथील अडीच एकर जमीन उपलब्ध होणार आहे. ही जमीन तत्काळ हस्तांतरीत केली जाणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.