उत्तराखंडमध्ये भूस्खलन, 9 मजूरांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । देहरादून

उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथे शुक्रवारी सकाळी भूस्खलन झाले असून तेथे ढिगाऱ्याखाली दबून 9 मजूरांचा मृत्यू झाला आहे. ही घटना केदारनाथ जवळील महामार्गावर ही दुर्घटना घडली असून अद्याप आणखी काही मजूर अडकले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.