
महेश पवार, सातारा
महाबळेश्वर पासून ८ किमी अंतरावर दुधोशी गावाच्या हद्दीत दरड कोसळली आहे. हे वृत्त हाती येईपर्यंत दरड हटवण्याचे काम सुरू झाले नव्हते. ही दरड कोसळल्यामुळे आंबेनळी घाटातून जड अवजड वाहनांची वाहतूक बंद झाली आहे. हलकी वाहने अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये घाट रस्त्याच्या कठड्याला घासून प्रवास करत आहेत. ही वाहतूकही सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्याबाबत विचार केला जाऊ शकतो. महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने ही दरड कोसळली असल्याचं सांगण्यात येत आहे.



























































