
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर समरौलीजवळ देवाल ब्रिज येथे भूस्खलन झाले. त्याचा परिणाम कश्मीरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर झाला. मातीचे ढिगारे हटवण्याचे काम सुरू आहे.जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग हा दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. जम्मूला कश्मीर खोऱ्याशी जोडणारा हा महामार्ग आहे. हा महामार्ग बंद झाल्याने केवळ पर्यटनावर परिणाम होणार नाही, तर जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवरही परिणाम होईल.
उधमपूर येथेही पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. धार रोडवर दुधर नाल्याजवळ बुधवारी भूस्खलन झाले होते. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
























































