‘लंतरानी’ साकारणार वेगळा प्रयोग

‘लंतरानी’ ही ‘झी 5’ची अँथॉलॉजी स्वरूपातील वेब सीरिज तीन वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या तीन कथांचे एकत्रीकरण आहे. या मालिकेतून वेगळा प्रयोग साकारत तीन स्वतंत्र चित्रपट – ‘डरना मना है’, ‘हुड हुड दबंग’ आणि ‘सॅनिटाइज्ड समाचार’ दाखवले जात आहेत. या तीन चित्रपटांचे दिग्दर्शन गुरविंदर सिंग, कौशिक गांगुली आणि भास्कर हजारिका या पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकांनी केले आहे. या प्रत्येक चित्रपटात हिंदुस्थानातील ग्रामीण भागातील वास्तव मनोरंजक शैलीत मांडले आहे. ‘लंतरानी’ मालिकेचा पहिला भाग 9 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे.

लहान शहरं आणि ग्रामीण जीवनाचे विविध पैलू उलगडणारी कथानपं जगण्यासाठी, अस्तित्वासाठी संघर्ष करणारी आहेत. यात जॉनी लिव्हर, जितेंद्र कुमार, जिशू सेनगुप्ता, प्रसिद्ध मल्याळम स्टार निमिषा सजयन आणि सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेता संजय महानंद अशा अनेक नामवंत कलाकारांचा समावेश आहे.