एमबीए प्रवेशाची अंतिम तारीख 31 ऑगस्ट

पारूल विद्यापीठाच्या ऑनलाइन एमबीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2023 आहे, अशी माहिती विद्यापीठाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. इच्छुक उमेदवार हे विद्यापीठाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. उमेदवारांकडे प्रमाणित विद्यापीठाची पदवी असणे तसेच बॅकलॉग नसणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी वयाचे बंधन नाही. अभ्यासक्रमात प्लेसमेंटसाठी सहकार्य करण्याची 100 टक्के हमी दिली जाते. नोकरभरतीसाठी 2500 पेक्षा कंपन्या उपलब्ध आहेत.