
दिवंगत बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांना स्क्रीन अवॉर्ड्स सोहळ्यात मरणोत्तर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. धर्मेंद्र यांचा पुरस्कार बॉबी देओलने स्वीकारला. धर्मेंद्रचे दोन्ही मुलगे सनी देओल आणि बॉबी देओल यांना इंडस्ट्रीत जो सन्मान मिळतो, त्याचे श्रेय बॉबीने आपल्या वडिलांनाच दिले. तो म्हणाला, ‘‘मी जिथेही जातो, तिथे मला खूप प्रेम मिळतं. कारण माझे वडील आणि भावासाठी सगळ्यांच्या हृदयाचे दरवाजे उघडे आहेत. लोक माझ्या वडिलांवर इतपं प्रेम करतात की ते विचार न करता मला आणि माझ्या भावाला स्वीकारतात,’’ असे बॉबी देओल म्हणाला.




























































