
शिवसेनेचे दिवंगत माजी खासदार मोहन रावले यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी शिवसेना दक्षिण मध्य मुंबई विभाग क्रमांक 11 च्या वतीने मंगळवार 22 डिसेंबर रोजी शोकसभा आयोजित करण्यात आली आहे.
मोहन रावले यांचे कार्यक्षेत्र असलेल्या परळ येथील डॉ. शिरोडकर हायस्कूल येथे मंगळवार सायंकाळी साडेसहा वाजता ही शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. रावले यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्य़ांनी या शोकसभेला उपस्थित रहावे असे विभागप्रमुख आशिष चेंबूरकर आणि महापौर व महिला विभाग संघटक किशोरी पेडणेकर यांनी कळवले आहे.
























































