शिंदेंच्या आभार सभेत ‘लाडक्या भावां’वर लाठीचार्ज

संगमनेर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार सभेचे प्रत्यक्षात ‘भारसभा’त रूपांतर झाले. जाणता राजा मैदानावर झालेल्या या सभेत आलेल्या ‘लाडक्या भावांना’च पोलिसांच्या लाठ्यांचा प्रसाद मिळाला.

एकनाथ शिंदे आपल्या भाषणात सतत ‘लाडकी बहीण’ असा उल्लेख करीत होते. मात्र, ‘लाडक्या भावांना’ काय दिले हे सांगण्याचे धैर्य त्यांनी दाखवले नाही. काही कार्यकर्त्यांनी तर आपल्याला लाडके म्हणून हाक दिली जाते; पण प्रत्यक्षात मिळते मात्र पोलिसांची लाठी, अशी जाहीर टिपण्णी केली. सभेला विखे-पाटील पिता-पुत्र गैरहजर राहिल्याने महायुतीतील दरी उघड झाली.