लातूर शहरातील अपार्टमेंटमधील दोन घरे फोडली, 3 लाख 60 हजाराचा ऐवज पळवला

1396

लातूर शहरातील अंबाजोगाई रोड भागातील एका अपार्टमेंटमधील दोन घरे चोरट्यांनी फोडली. सुमारे 3 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज पळवण्यात आला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील चोरी प्रकरणी रामप्रसाद विद्याधर कुलकर्णी रा. विनायक बी.विंग अपार्टमेंट, फुलाबाई बनसोडे हॉस्पिटल शेजारी अंबाजोगाई रोड लातूर यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, फिर्यादीच्या घराचे लोखंडी गेट व दराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील कपाटाचे लॉक तोडून कपाटातील 7 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख 30 हजार रुपये असा एकूण 2 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज पळवला.

त्याचप्रमाणे फिर्यादीचे अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरील विवेकानंद सुभाषअप्पा मरळे यांच्या घराचेही कुलूप तोडले. लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून कपाटातील 4 तोळे सोन्याचे दागिने किंमत 1 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज पळवला. अज्ञात चोरट्यांविरुध्द या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या