
औसा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग किल्लारी-लामजना महामार्गावरील तपसे चिंचोलीजवळ सोमवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेत प्रसाद सूर्यवंशी व आकाश जाधव अशी मृतांची नावे आहेत. दोघेही उमरगा तालुक्यातील मुळज येथील आहेत. मयत प्रसार सूर्यवंशी हा दुचाकी क्रमांक एम.एच. २५ एव्ही ६४९३ क्रमांकाच्या दुचाकीवरुन त्याचा मित्र आकाश जाधव लातूर येथून परीक्षा देऊन दुचाकीवरून मुळजकडे परतत होते. किल्लारी-लामजना दरम्यान क्रेटा कार व दुचाकीचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीस्वार दोघेही तरुण जागीच ठार झाले. मृतांपैकी प्रसाद सूर्यवंशी हा शासकीय कर्मचारी होता असे सांगण्यात येत आहे. परीक्षा आटोपून मित्रासह गावाकडे परतत असताना हा दुर्दैवी अपघात घडला. झाला असून पुढील तपास किल्लारी पोलिस हे करीत आहेत.






























































