दारूच्या नशेत मित्राचा केला खून, डोक्यात दगड घालून स्क्रु ड्रायव्हरने केले वार

2024

चाकुर येथे मंगळवारी लातुर नांदेड महामार्गावरील एका फर्निचर दुकानासमोर लातूर येथील एका गॅस एजन्सीवर काम करणाऱ्या तरूणाच्या डोक्यात हत्याराने वार करून खून करण्यात आला होता. यातील संशयीताला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यश आले आहे,

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लातुर येथील एका गँस एजन्सीमध्ये काम करत असलेला प्रभाकर सांळुके (वय – 28 वर्षे, रा.लातुर) यांच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून खून झाला होता. या प्रकरणी अधिक तपास करण्यासाठी लातुर येथील स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाचे पोलिस निरीक्षक सुनिल नागरगोजे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास करण्यासाठी विशेष पोलिस पथकाची स्थापना केली होती. तपासा अंती शुक्रवारी सकाळी अहमदपूर तालुक्यातील लांजी येथून धनराज सुधाकर आगलावे (वय – 27) यास ताब्यात घेतले असून गुन्हात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

लातूर येथून तीन मित्र चाकूरकडे आले होते. त्यांनी दारूच्या नशेत भांडण करून प्रभाकर साळूंखे याच्या डोक्यात दगड व स्क्रु ड्रायव्हरने वार करून खून केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या सोबत राजू लक्ष्मण गायकवाड हा मित्र होता, पोलिस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक नागरगोजे यांनी ‘दै. सामना’स बोलताना दिली.

दरम्यान, मित्रानेच दारूच्या नशेत खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत मयताचा भाऊ दिनेश साळूंके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरूध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनिल नागरगोजे यांच्या  मार्गदर्शनाखाली  सहाय्यक पोलिस निरीक्षक बी. आर. भालेराव, पोलिस हवालदार राजेंद्र टेकाळे, प्रकाश भोसले, सचिन धारेकर, नागनाथ जांभळे यांच्या पथकाने त्या संशयीतास पकडले.

आपली प्रतिक्रिया द्या