
लातूर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले असून लाखो हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 148 गावातील 210 जनावरांचा मृत्यू झाला आहे. 6 व्यक्तींनीही आपला जीव गमावला आहे. लातूर जिल्ह्यातील 815 गावातील 5 लाख 2 हजार 779 शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. लातूर जिल्ह्यातील तब्बल 3 लाख 68 हजार 896.55 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटामुळे सर्व जण सुन्न झाले आहेत.
लातूर जिल्हा महाराष्ट्रात दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. लातूर शहरात रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागला होता. दर तीन वर्षांनी दुष्काळाचा सामना करावा लागतो. वातावरण बदलाचा परिणाम म्हणून कधी अति पाऊस पडत आहे, कधी बर्फ पडतोय तर कधी पाऊसच पडत नाही. या वर्षी लवकर पाऊस सुरू झाला. नदी, नाले तुडुंब वाहिले. पावसामुळे अनेक मार्गावरील रस्ते वाहतूक बंद पडली होती. मात्र पावसाचा जोर कायम राहिला आणि पूर परिस्थिती निर्माण झाली.
अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यातील 148 गावातील 210 जनावरे मृत्युमुखी पडली. जळकोट आणि निलंगा तालुक्यातील 6 जणांचा मृत्यू झाला. 5 घरे पूर्णतः पडली आहेत, तर 158 घरे अंशतः पडली आहेत. 965 कच्ची घरे पडली आहेत.
लातूर जिल्ह्यातील 815 गावातील 5 लाख 2 हजार 779 शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. यात लातूर तालुक्यातील 63 गावातील 67,887 शेतकरी, औसा तालुक्यातील 127 गावातील 59,033 शेतकरी, रेणापूर तालुक्यातील 68 गावातील 45,778 शेतकरी, निलंगा तालुक्यातील 162 गावातील 83,187 शेतकरी, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील 50 गावातील 24,087 शेतकरी, देवणी तालुक्यातील 78 गावातील 38,841 शेतकरी, उदगीर तालुक्यातील 118 गावातील 57,283 शेतकरी, जळकोट तालुक्यातील 47 गावातील 20,700 शेतकरी, अहमदपूर तालुक्यातील 124 गावातील 57,737 शेतकरी, चाकूर तालुक्यातील 82 गावातील 48,246 शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.
Beed news – कुंडलिकेच्या पुरात तरूण वाहून गेला, 18 तासानंतरही शोध लागेना
लातूर जिल्ह्यातील 3 लाख 68 हजार 896. 55 हेक्टर क्षेत्रावर असलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. यात लातूर तालुक्यातील 51,407.82 हेक्टर, औसा तालुक्यातील 47,353 हेक्टर, रेणापूर तालुक्यातील 29,094 हेक्टर , निलंगा तालुक्यातील 64,670.8 हेक्टर, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील 19,048 हेक्टर , देवणी तालुक्यातील 22,556 हेक्टर , उदगीर तालुक्यातील 38,923 हेक्टर, जळकोट तालुक्यातील 15,600 हेक्टर, अहमदपूर तालुक्यातील 42,863.93 हेक्टर, चाकूर तालुक्यातील 34,380 हेक्टर क्षेत्रावरील शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. जिल्ह्यातील 3,68,612.75 हेक्टर जिरायती शेतीचे, 220.6 हेक्टर बागायती शेतीचे तर 62.6 हेक्टर फळपिकांच्या शेतीचे नुकसान झाले आहे.
Latur News – मांजरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली; पूरस्थितीने बळीराजा हतबल, सर्वसामान्य सुन्न

































































