
लातूरमधील देवणी तालुक्यातील गुरधाळ येथील एका शेतकऱ्याने सततची नापिकी व वाढत्या कर्जाला कंटाळून बुधवारी घराच्या स्लॅब च्या कडीला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. श्रीधर पंढरी घोगरे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.
घोगरे यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतून कर्ज घेतले होते. पेरणीनंतर तब्बल 40 दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने यावर्षीही नापिकी होणार. आता बँकेचे कर्ज कसे फेडायचे व घर प्रपंच कसा भागवायचा या विवंचनेत ते गेल्या काही दिवसांपासून होते असे त्यांच्या नातलगांनी सांगितले.