लातुरातील फायनान्सचे कार्यालय चोरट्यांनी फोडले, पावणे दोन लाखांची रक्कम लंपास

शहरातील बार्शीरोड भागातील फायनान्सचे ऑफीस अज्ञात चोरट्यांनी फोडले. रोख 1 लाख 83 हजार 729 रुपये चोरुन नेण्यात आले आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील चोरी प्रकरणी उमेश अशोक शेंडे यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, लातूर शहरातील बार्शी रोडवरील रिलायन्स पेट्रोलपंपाशेजारी बेरार फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. अज्ञात चोरट्यांनी कार्यालयाच्या मुख्य दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाट उघडून कपाटाचे लॉकर तोडले, रोख 1,83,729 रुपये चोरुन नेले.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात या चोरी प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक नेहरकर हे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या