लातूर – उसने पैसे द्यावेत म्हणून चावून कान तोडला

प्रातिनिधिक फोटो

पैसे उसने दिले नाहीत म्हणून एका माणसाने चक्क चावून कान तोडल्याची घटना लातूर येथील चाकुर येथे घडली आहे. या प्रकरणातील पीडित व्यक्तीला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली आहे.

ही घटना चाकूर तालुक्यातील खुर्दळी येथे घडली. या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात संतोष किशनराव अनचितलवार यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, फिर्यादी हे गावातील मारूती मंदिराच्या ओट्यावर बसले असताना सचिन मारूतीराव भालेराव (रा. खुर्दळी) हा तेथे आला. त्याने उसने 500 रुपये द्यावेत म्हणून मागणी केली व शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण केली.

एवढ्यावरच न थांबता फिर्यादीच्या कानाला जोरात चावून त्याने त्याच्या कानाचा तुकडा पाडला. या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात सचिन मारूती भालेराव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी तुडमे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या