लातूर- तोंडारपाटी येथून अल्पवयीन मुलास पळवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उदगीर तालुक्यातील मौजे तोंडार पाटी येथून अल्पवयीन मुलास पळवून नेण्यात आले आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तिविरुद्ध उदगीर ग्रामिण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणी यशपाल नागनाथ साळुंके (रा. शिरोळ वांजरवाडा ता. निलंगा) यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की तो तोंडारपाटी येथील पोल्ट्री फार्मवर काम करीत होता. त्याच्या बहिणीचा मुलगा रितेश वैजनाथ गायकवाड(12) हा त्याच्यासोबत मागील दोन महिन्यांपासून राहात होता. मोटारसायकलच्या टायरसोबत खेळत असताना अज्ञात व्यक्तीने त्याला पळवून नेले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.