Latur News – संजय गायकवाड यांनी शेतकऱ्याला मदत केलेला एक बैल मारका! आमदार निवासातील राड्या बरोबर बैलाचीही चर्चा

अहमदपुर तालुक्यातील हडोळती येथील शेतकरी अंबादास पवार यांनी खांद्यावर जू घेऊन त्यांच्या पत्नीसह औत ओढत असतानाचे वृत दै. सामनाने प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत राज्यभरातून अनेकांनी त्यांना मदतीचा हात दिला. यामध्ये वादग्रस्त वकव्याने सदा चर्चेत असणारे बुलढाण्याचे मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा सुद्धा समावेश आहे. त्यांनी पवार दांम्पत्याला बैल जोडी दिली होती. पंरतु यातला एक बैल मारका निघाला आहे. बैल कोणालाही जवळ येऊ देत नाही. जर कोणी जवळ गेलं तर, बैल लाथ मारतो. त्यामुळे पवार दांम्पत्यामध्ये भीतीचे वातावरण आहे.

सदा वादग्रस्त वकतव्य करणारे आमदार गायकवाड यांनी मुंबई येथील उपहारगृहातील कर्मचाऱ्याला मारहाण केलेली बातमी चर्चेत असतानाच आता हा बैल मारका असल्याने ही बातमी सुद्धा लातुर जिल्हयात चवीने चर्चेचा विषय ठरत आहे. “मारक्या आमदाराने मारका बैल दिला”, अशी चर्चा होत आहे. औत ओढताना सुद्धा हा बैल तुंबून व पाये खोरून औत ओढत असून हा बैल कोणालाही जवळ येऊ देत नाही. त्याचा पवित्रा पाहीला का भितीदायक परिस्थीती दिसते त्यामूळे या वयस्कर शेतकऱ्याने त्यांना हा बैल मारत असल्याने या शेतकऱ्याने छोटया भावाला हे बैल कसून खाण्यासाठी दिले आहेत. हा बैल सोडण्या बांधण्यासाठी दोन माणसं लागतात त्यामूळे शेतकरी हैराण आहे .