
लातूर-बार्शी रोडवरील उड्डाणपुलावर सोमवारी दुपारी रिक्षा आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला.
सुमन सूर्यकांत धोत्रे, प्रतीक्षा संतोष पस्तापुरे, आणि शिवाजी ज्ञानोबा कतलाकुटे अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर शैलेश भागवत धोत्रे, पिंकी अनिल धोत्रे, अभिजीत अशोक घाडगे अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.
बारा नंबर पाटीकडून येणारा ट्रॅक्टर लातूरकडे भरधाव वेगात येत होता. तर रिक्षा लातूर शहरातून एमआयडीसीकडे चालली होती. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.