
अभय मिरजकर, लातूर
लातूर – औसा रस्त्यावरील पेठ जवळील शकुंत पेट्रोल पंपाजवळ ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा अपघात झाला. शनिवारी रात्री ८ ते साडेआठच्या दरम्यान ही घडना घडली असून या अपघातात स्कॉर्पिओ गाडीतील दोन सख्ख्या चुलत भावांचा जागीच मृत्यू झाला आहे.
औसाहून लातूरला जात असताना स्कॉर्पिओ गाडीला समोरून आलेली दुचाकीला वाचवताना लातूरहून औसाकडे जाणाऱ्या ट्रकची जोराची धडक लागली. या अपघातात स्कॉर्पिओ रस्त्याच्या एका बाजुवरून दुसऱ्या बाजूस फेकली जाऊन तिथे असलेल्या पंक्चरच्या दुकानात घुसली. त्यात स्कॉर्पिओ गाडीतील समीर कलिम शेख व नाजर चाँद शेख या दोन चुलत भावांचा मृत्यू झाला आहे.
दोघेही औसा येथील निलंगा वेस आझाद चौकातील रहिवासी आहेत. या अपघाताबाबात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. अपघातातील समीर हा कलीम मिस्त्री यांचा मुलगा होता तर नाजर हा पुतण्या होता. या दुर्घटनेमुळे आझाद चौक परिसरात शोककळा पसरली आहे.


























































