
शहरातील अजिंक्य मेगासिटी भागातील एका घरात घरफोडी करत अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 281,000 रुपयाचा ऐवज पळवला. या प्रकरणी सिध्देश्वर उमाकांत आलमले यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रा दिली. फिर्यादी हा मामाचे निधन झाल्याने अंत्यविधीसाठी कुटुंबासह घरास टाळे लावून गावी गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या घराचे टाळे तोडुन आत प्रवेश केला. आतील सोने, चांदी व रोख रक्कम असा एकूण 2,81,000 रुपयांचा ऐवज चोरुन नेला. शेजारील घरातील कुलूप तोडून चोरी करण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरफोडी करून 72 हजार 750 रुपयांचा ऐवज पळवला
शहरातील घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 72750 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने पळवला. या प्रकरणी रमेश राजेंद्र पाटील यांनी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या घराचे कुलूप कोंडा तोडून आत प्रवेश केला. लोखंडी कपाटातील सोन्याचे व चांदीचे दागिने (किंमत 53,750 रुपये) व रोख रक्कम 19000 रुपये असा एकूण 72750 रुपयाचा ऐवज पळवला. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.































































