
हिवाळा सुरु झाल्यावर बाजारात विविध पालेभाज्या दिसू लागतात. यामध्ये पांढराचुटूक मुळा आपले लक्ष वेधून घेतो. हिवाळ्यामध्ये मुबलक प्रमाणात मुळा खाण्याचे खूप फायदे आहेत. हिवाळ्यामध्ये घरामध्ये मुळ्यापासून विविध पदार्थ बनवले जातात. यामध्ये मुळ्याचा पराठा, कोशिंबीर किंवा मुळ्याची भाजी असे विविध प्रकारचे पदार्थ घरी होतात. मुळा केवळ आपल्या जिभेची चव वाढवतोच असे नाही तर, मुळ्यामध्ये मुबलक प्रमाणात आरोग्यासाठी उपयुक्त गुणधर्म असतात. म्हणूनच मुळ्याला आरोग्याचा खजिना असे म्हटले जाते.
मेंटली फीट राहण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे, जाणून घ्या
मुळा फायबरने समृद्ध असतो, त्यामुळे पचनक्रिया उत्तम होण्यास मदत होते. तसेच मुळा आहारात असल्याने, बद्धकोष्ठता दूर राहते. मुळा खाण्यामुळे आपले आतडे स्वच्छ आणि निरोगी राहते. तसेच पोट हलके राहण्यासही मदत मिळते.
मुळा व्हिटॅमिन सी ने समृद्ध असतो. त्यामुळे हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मुळा खायलाच हवा. यामुळे हिवाळ्यातील आजारांवर मात करता येते. हिवाळ्याच्या सीझनमध्ये मुळा खाण्यामुळे सर्दी आणि फ्लूपासून रक्षण होते.
मुळा हा मधुमेहींसाठी संजीवनी मानला जातो. मुळ्यामध्ये असलेल्या संयुगांमुळे, शरीरातील इन्सुलिनची पातळी नियंत्रित राहते. तसेच मुळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी असल्याकारणाने मधुमेहींसाठी हा एक उत्तम पर्यायही मानला जातो.
मुळ्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण हे उत्तम असते. त्यामुळे रक्तवाहिन्यांनांसाठी अतिशय महत्त्वाचे मानले जाते. मुळ्यातील गुणांमुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत मिळते.
मुळ्यांमधील पाण्याचे प्रमाण आणि जीवनसत्त्वे त्वचेला मॉइश्चरायझ करतात. मुळा खाल्ल्याने त्वचा उजळण्यास आणि कोरडेपणा टाळण्यास मदत होते.
चेहऱ्यावर चमक येण्यासाठी हे दोन पदार्थ लावायलाच हवेत, जाणून घ्या
मुळा हे यकृत आणि पोटाच्या समस्यांसाठी एक नैसर्गिक उपाय मानला जातो. मुख्य म्हणजे मुळा हा कावीळच्या उपचारातही उपयुक्त ठरतो.
मुळ्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण हे खूप कमी असते. मुख्य बाब म्हणजे मुळ्यात फायबर सर्वाधिक प्रमाणात असतात. त्यामुळे आपले पोट बराच काळ भरलेले राहते. यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.
मुळ्यात असणारे दाहक-विरोधी गुणधर्म शरीरातील सूज आणि सांधेदुखीपासून आराम देतात.
मुळ्यामध्ये आयसोथायोसायनेट्स सारखी संयुगे असतात. यामुळे शरीरात कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत होते.


























































