एलईडी बल्ब बनले ‘समुद्री कचरा’! बल्बची प्रशासनाकडून दखल नाही

439

गेल्या 15 दिवसांत दांडी व कोळंब समुद्रकिनारी वाहून आलेले हंडी आकाराचे तीन एलईडी बल्ब पोलिसांनी संशयास्पद वस्तू म्हणून पंचनामा करून ताब्यात घेतले होते. परंतु बेकायदा होणाऱ्या एलईडी मासेमारीसाठी वापरले हे बल्ब मत्स्य विभागाची जबाबदारी असल्याने पोलिसांनी हे तिन्ही बल्ब मत्स्य विभागाच्या ताब्यात दिले होते.

गेले दोन दिवस वायरी आणि दांडी आवार समुद्रकिनारी वाहून आलेले एलईडी बल्ब ताब्यात घेण्यासाठी पोलीस किंवा मत्स्य विभागापैकी कुणीही पुढे न आल्याने हे बल्ब ‘समुद्री कचरा’च असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या हे बल्ब मच्छीमारांकडेच पडून आहेत. आतापर्यंत दांडी येथे दोन, कोळंब आणि वायरी जाधववाडी समुद्रकिनारी प्रत्येकी 1 असे हंडी आकाराचे चार तर दांडी आवारवाडी येथे पाण्याखाली सोडला जाणारा 4 हजार वॅट क्षमतेचा एक असे एकूण पाच बल्ब आढळले आहेत. त्यापैकी दांडी व कोळंब येथून पोलिसांनी पंचनामा करून एलईडी बल्ब ताब्यात घेतले होते.

…तर हा समुद्री कचराच
जेव्हा जेव्हा एलईडी बल्ब समुद्रकिनारी वाहून आलेत तेव्हा तेव्हा आम्ही पोलिसांना त्यासंदर्भात माहिती दिली. तसेच मत्स्य विभागालाही कळविले आहे. परंतु आता जर शासकीय यंत्रणा हे एलईडी बल्ब ताब्यात घेणार नसेल तर आम्ही ‘समुद्री कचरा’ म्हणूनच ते गोळा करणार आहोत.
– महेंद्र पराडकर, मच्छीमार

आपली प्रतिक्रिया द्या