लेन्स आय: परिसरातील पक्षी निरीक्षण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>ऋता कळमणकर

पक्षी निरीक्षणासाठी अथवा पह्टोग्राफीसाठी नेहमीच जंगल पर्यटनच करायला हवे असे नाही. आपल्या आजूबाजूच्या परिसरावर आपण थोडं जागरुकतेने पाहायला शिकलो तरी कितीतरी पक्षी, फुलपाखरे अगदी सहज दृष्टीस पडतात. आपल्या आजूबाजूला राहतात म्हणून त्यांचं महत्त्व काही कमी होत नाही.

मोहक गडद निळा आणि चमकदार फिक्या निळ्या रंगाने बघणाऱयाचे लक्ष वेधून घेणारा आकर्षक पक्षी म्हणजे नीलपंठ, नीलपंख, ब्लूजे, तास, चास किंवा इंडियन रोलर या नावाने ओळखला जातो. थोडा गावाबाहेर तारेवर हमखास दिसतो. इंडियन रोलर निळा माथा, निळे जांभळे पंख, तपकिरी छाती असा. या पक्ष्यात नर आणि मादी दिसायला सारखेच असतात. अतिशय समृद्ध, डोळ्यांचे पारणे फेडणारी रंगसंगती. हा प्रामुख्याने कीटकभक्षी आहे. खरं तर पक्ष्यामुळे परिसर सुंदर दिसतो. त्यांच्या किलबिलीने मन प्रसन्न होते. त्याचबरोबर प्रचंड प्रजनन क्षमता असणारे कृमी, कीटक जे नुकसान करू शकतात. ते किडे, अळ्या पक्ष्याच्या अन्नाचा मुख्य भाग असतात. पिकांचे, झाडाचे नुकसान करणारे किडे खाऊन हे पक्षी आपल्याला मदतच करतात.

पह्टोग्राफीची सुरुवात केली की, प्रथम आपलं लक्ष वेधून घेतात ते सर्वत्र सर्रास दिसणारे सूर्य पक्षी. या सर्व रंगबेरंगी पक्ष्यांचे हे रंग त्यांना कसे प्राप्त होतात? हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. हिरवागार पोपट तसेच तेजस्वी निळ्या रंगाचा खंडय़ा, पिवळाधम्मक हळद्या असे कितीतरी पक्षी आपल्याला पॅमेऱयात बंदिस्त करावेसे वाटतात. पक्षी हे निसर्गाला पडलेले सुंदर स्वप्न आहे असे म्हणतात, तर हे पक्षी शरीरात मेलॅनिन हे पिगमेंट स्वतः तयार करतात, परंतु निळे, पिवळे, तांबडे रंग त्यांना त्यांच्या खाण्यात येणाऱया फळे, बेरी, बिया यांच्यामध्ये असणाऱया पॅरोटेनॉइड पिगमेंटमुळे प्राप्त होतात. जेव्हा जोडीदार निवडण्याची वेळ येते तेव्हा मादी जास्त तेजस्वी व गडद रंगाचा नर निवडते. कारण त्यांचे गडद रंग हे त्याच्या चांगल्या आरोग्याचे प्रतीक असते. त्यातल्या त्यात उष्ण कटिबंधातील पक्षी जास्त रंगीत आढळतात.

स्केली मुनिया किंवा ठिपक्यांची मुनिया, गोड चिमुकला चॉकलेटी अंगाची आणि पोटाकडचा भाग सुंदर खवल्याची नक्षी असणारा. हिंदुस्थानात सर्वत्र दिसणारा हा पक्षी धान्य, बिया हे त्याचे खाद्य, मोठय़ा मोठय़ा थव्याने शेतातील धान्य फस्त करताना दिसतो, शहरात ही जोडीने दिसतो.

जांभळा सूर्यपक्षी हा अणकुचीदार चोचीचा सुंदर पक्षी. या फुलावरून त्या फुलावर फुलातील मधुरस प्राशन करीत भिरभिरतो. अगदी चमकदार, गडद रंग असणारा हा हिंदुस्थानभर दिसणारा पक्षी शेती, दाट फुलझाडे, झुडपांच्या प्रदेशात दिसतो, शक्यतोवर जोडीने दिसतो. फुलातील मधुरस चाखण्यासाठी खास चोचीची रचना असणारा हा पक्षी फुलांवर बसलेले किडे अळ्या पण खातो. लहानपणापासून परिचित असणारा हिरवागार सुंदर पक्षी म्हणजे पोपट. बेमालूम पाने झाडाच्या पानांत लपून जाणारा हा पक्षी हिंदुस्थानभर आढळतो. फळे, धान्य, शेंगांमधील दाणे आवडीने खातो.
अगदी सहजासहजी दिसणारी खंडय़ाची प्रजाती व्हाईट ब्रेस्टेड किंगफिशर, पांढऱया छातीचा खंडय़ा नाल्याजवळ छोटय़ा पाणवठय़ाजवळ हटकून दिसतो. हिंदुस्थान बहुतांश ठिकाणी अगदी सहज सापडतो. माश्यांसोबत किडे, सरडे, बेडूक इत्यादी खातो. धारदार लाल चोच आणि अतिशय सुंदर निळा रंग यामुळे उठून दिसतो. मार्च ते जुलै यांचा विणीचा हंगाम असून मातीत बिळे करून मादी अंडी घालते.

थोडासा गावाबाहेर, शेतात, मोकळ्या रानात सहजासहजी दिसणारे अजून काही पक्षी म्हणजे कोतवाल, नाचरा आणि शहरातही झाडाझुडुपांमध्ये दिसणारा दयाळ, शिंपी, लाल बुडाची मैना असे कितीतरी लहानमोठे पक्षी आपल्या आजूबाजूला वावरताना दिसतात.

– [email protected]