
कराड तालुक्यात एका बिबट्याचा विषबाधेने मृत्यू झाला आहे. बिबट्याला वाचविण्याचा वनविभागाने प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही.
दोन वर्षाचा बिबट्या असुन त्याला विषबाधा झाली असल्याचे वनाधिकार्यांनी सांगितले. सदर बिबट्याची माहिती कळताच वनविभागाचे अधिकारी तुळसण गावी पोहचले. वनविभागाच्या डॉक्टरांनी प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. अखेर बिबट्याचा मृत्यू झाला.
























































