
सामना प्रतिनिधी । नगर
नगरमधील विखे पाटील यांच्या प्रवरा रुग्णालयात एक बिबट्या घुसला आहे. लोणीतील इस्पितळात हा बिबट्या घुसला असून त्याच्या हल्ल्यात सुरक्षारक्षक जखमी झाला आहे. माहिती वनविभागाने घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. व बिबट्याला पकडन्यासाठी वनविभाग आणि पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

























































