
सामना ऑनलाईन । हिंगोली
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 25 सप्टेंबरला शिउर शिवारात बांधलेल्या जनावरावर बिबट्याने हल्ला करुन ठार मारले होते. त्यावेळी वनविभागाने बसविलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या गुराचे लचके तोडताना कैद झाला आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, कळमनुरी परिसरात बिबट्याच्या हल्यात 5 ते 6 जनावरे ठार झाली आहेत. त्यामुळे वनविभागापूढे बिबट्याला पकडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.




























































