शिरुरच्या जांबुतमधील नरभक्षक बिबट्या जेरबंद

813

शिरुर तालुक्यातील सरदवाडी (जाबुत ) येथे एका नरभक्षक बिबटयाला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून परीसरातील शेतकरी वर्ग बिबटयाच्या दहशतीमुळे हवालदिल झाला होता. आता बिबट्याला जेरबंद करण्यात यश आल्याने त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

काही महिन्यांपूर्वी सरदवाडी येथील एका लहान मुलीवर बिबटयाने हल्ला करून तिला ठार केले होते. त्यानंतर वन विभागाने या परीसरात सात पिंजरे लावले होते. दहा दिवसापुर्वी त्यामधे एक बिबटया सापडला होता. त्या नंतर लगेच दुसरा बिबटया जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. हा बिबटया मोठा होता. जाळीत जेरबंद झाल्यानंतर सुटण्यासाठी त्याने धडकी देऊन जाळी तोडण्याचा प्रयत्न केला होता. वनकर्मचाऱ्यानी त्याला मानिकडोह येथे बिबटया निवारा केंद्रात नेले आहे. या परीसरात घोड व कुकडी नदीच्या पट्ट्यात मोठया प्रमाणात ऊसाचे क्षेत्र व मुबलक पाणी असल्यामुळे जांबुत वडनेर, टाकळी हाजी ,निमगाव दुडे, कवठे येमाई ,परीसरात मोठया प्रमाणात बिबटयांचा वावर आहे. जांबुत परीसरात तर बिबट्याने ठाणच मांडले होते. बिबट्याच्या हल्ल्याच्या शक्यतेमुळे परिसरात दहशत पसरली होती.

 

आपली प्रतिक्रिया द्या