
हिंदुस्थानचे उपलष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज शेठ यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे लष्कराच्या पुण्यातील दक्षिण मुख्यालयाच्या प्रमुखपदावरून ते मंगळवारी कार्यमुक्त झाले. आज ते उपलष्करप्रमुख पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.
दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग हे चाळीस वर्षांच्या लष्करी सेवेतून 30 जून 2024 रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची नियुक्ती करण्यात आली होती. दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी ऑपरेशनल सज्जता, संस्थात्मक परिवर्तन आणि भविष्यासाठी सज्ज सैन्य उभारण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सेवा बजावली आहे.



























































