
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
पैशाची मागणी करत आई बहिणीवरुन शिवीगाळ केल्याच्या रागातून उमाशंकर प्रसाद याचा खून करणार्या मनोज नोनिया याला मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा आणि पुरावे नष्ट करणाऱ्या देवेंद्र लट्टू सिंग याला 5 वर्ष सक्तमजूरीची शिक्षा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस़ एस गायकवाड यांनी सुनावली.
6 नोव्हेंबर 2017 रोजी एमआयडीसी येथे ही घटना घडली होती. उमाशंकर प्रसाद याचा खून करुन त्याचा मृतदेह एमआयडीसीतील रस्त्यावर टाकण्यात आला होता. त्यावेळी पोलिसांनी कारवाई करत मनोज नोनिया आणि देवेंद्र लट्टूसिंग या दोघांना अटक केली. या दोघांवर 302 आणि 234 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आज सुनावणीनंतर मनोज नोनिया याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि पुरावे नष्ट करणार्या देवेंद्र लट्टूसिंग याला 5 वर्ष सक्तमजूरीची शिक्षा सुनावण्यात आली. सरकारी पक्षाकडून अॅंड. विनय गांधी यांनी काम पाहीले.































































