एलआयसीने विकले 1.36 कोटींचे शेअर

भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) ने आपली भागीदारी 9.5 टक्क्यांवरून 7.5 टक्के केली आहे. या निर्णयाची माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या अधिकृत पत्र (फॉर्मल डिस्क्लोजर लेटर) मध्ये दिली आहे. एलआयसीने 23 नोव्हेंबर 2021 पासून आतापर्यंत ओपन बाजारात या शेअरची विक्री केली आहे. यादरम्यान एलआयसीने 1,36,67,607 शेअर्सची विक्री केली आहे. या विक्रीनंतर एलआयसीची भागीदारी 6,47,02,813 शेअर्सवरून 5,10,35,206 शेअर्स राहिली आहे.