नॉन स्टिक तवा असूनही डोसा चिकटतो…हे करून पहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नॉन स्टिक तवा असूनही डोसा चिकटतो कारण तवा घासताना चुका होतात. तवा गरम असताना नळाखाली टाकू नका. त्यामुळे धातूवर ताण येतो. त्याचे कोटिंग सैल होते. तवा घासताना लोखंडी काथ्याऐवजी मऊ स्पंज वापरा.

तव्यावर जाडे मीठ टाकून पेपर नॅपकिनने हलके घासून घ्या. यामुळे जळलेला थर निघून जाईल. डोसा करण्यापूर्वी तव्यावर अर्धा कापलेला कांदा तेलात बुडवून फिरवा. यामुळे तव्याला नैसर्गिक ‘नॉन-स्टिक’ लेअर मिळतो. मोठय़ा फ्लेमवर तवा वापरू नका.