शिवडी किल्ला आकर्षक रोषणाईने उजळला; मुंबईकर, पर्यटकांची पसंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवडी येथील प्राचीन आणि ऐतिहासिक किल्ला आकर्षक रोषणाईने उजळला आहे. पर्यटकांच्या आकर्षणासाठी पालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी रंगीबेरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली असल्यामुळे हा किल्ला मुंबईकर आणि पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे.

प्रभाग क्र. 206 मध्ये असणारा शिवडी किल्ला 1860 मध्ये बांधण्यात आला आहे. हा किल्ला मुंबईकर-पर्यटकांसाठी आकर्षण राहिला आहे. एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून या ठिकाणी आकर्षक रोषणाई करावी अशी मागणी स्थानिक नगरसेवक सचिन पडवळ यांनी केली होती. त्यानुसार किल्ल्यावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

वास्तुशास्त्राचा नमुना

कळसासारखा दिसणारा शिवडी किल्ला हा प्राचीन वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. त्यामुळे हा किल्ला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. परळच्या बेटाच्या पूर्व किनार्‍यावरील टेकडीवर असणार्‍या या किल्ल्याचे नूतनीकरण, मजबुतीकरण आणि सुशोभीकरण इंग्रजांनी केले होते.