पेरणी करण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय तरुण आणि सालगड्याचा वीज पडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील दक्षिण शेद येथे आज सायंकाळी रोजी 5 च्या सुमारास पेरणीच्या पिकाची पाहणी करण्यास गेलेले असताना वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. अभिजीत राजकुमार मोरे (वय – 17) आणि गौतम कांबळे (वय – 34) यांचा वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली .

मिळालेल्या माहितीनुसार, अभिजित राजकुमार मोरे हा प्रियदर्शनी उच्च माध्यमिक विद्यालय साक़ोळ येथे शिकत होता, तर गौतम कांबळे हा त्याच्या शेतात सालगडी म्हणून काम करत होता. शेतात झालेल्या पिकाची पाहणी करण्यास गेलेले असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. वीज पडल्यामुळे या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर महसूल प्रशासनाच्या अधिकारी व पोलिस आणि प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पंचनामा करून त्या दोघांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला आहे.