
सामना प्रतिनिधी । मुंबई
कोल्हापूरच्या लिमरास शेख याची महाराष्ट्राच्या 17 वर्षाखालील क्रिकेट टीममध्ये निवड करण्यात आली आहे. लिमरास नॅशनल क्रिकेट टुर्नामेंटमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. लिमरास शेख हा विबग्योर हाय, कोल्हापूरच्या शाळेत नववी इयत्तेत शिकणारा विद्यार्थी आहे. वयाच्या अवघ्या चार वर्षांपासून क्रिकेटमध्ये समरसून गेलेला लिमरास मिडल-ऑर्डर स्ट्राइक बॅटस्मन आणि लेगस्पिनर असून त्याच्या अंगी असलेले अष्टपैलूत्व या महिन्यात रंगणार्या टुर्नामेंटमध्ये त्याच्या टीमचे भाकीत ठरविण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका वठवेल. ‘मला कधी महाराष्ट्राच्या 17 वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट टीममध्ये खेळण्याची संधी मिळेल असा विचार मला स्वप्नातदेखील आला नव्हता. हे सर्व श्रेय माझे मिहीर देवपुजे (एसपीए प्रशिक्षक) आणि सूरज जाधव यांना जाते. त्यांनी मला लक्ष केंद्रित करण्यासाठी, तंत्र सुधारण्याकरिता आणि माझ्या दोषांवर मेहनत घेण्यासाठी बरीच मदत केली.


























































