Lionel Messi Kolkata Visit – सॉल्ट लेक स्टेडियमची तोडफोड, कोलकाता पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनल मेस्सी कोलकातामध्ये आल्यानंतर सॉल्ट लेक स्टेडियमवर राडा झाला होता. लिओनल मेस्सीला पाहता न आल्यामुळे आणि लिओनल मेस्सी स्टेडियममध्ये अवघ्या काही मिनिटांसाठी थांबला. त्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला आणि संतापलेल्या चाहत्यांनी स्टेडियमची तोडफोड केली. याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी आता दोघांना अटक केली आहे.

सॉल्ट लेक स्टेडियमवर झालेल्या तोडफोडीप्रकरणी कोलकाता पोलिसांनी गौरब बासू आणि शुभोप्रतिम डे या दोघांना ताब्यात घेतलं आहे. तसेच त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 221, 132, 121/1, 121 (2), 324 (5), 117 (2), 118 (2) आणि 3 (5) या कलामांतर्गत कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी ऑर्गनायझर सतार्दू दत्ताला सुद्धा बिधाननगर न्यायालयाने रविवारी (14 डिसेंबर 2025) 14 दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे.